प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठिण, फोटो पाहून चाहतेही पडतायेत बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:47 PM2021-07-29T16:47:03+5:302021-07-29T16:57:08+5:30

स्टायलिश आणि फॅशनच्याबाबती अभिनेत्री भल्याभल्यांना टक्कर देते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सनेही तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला ओळखणेही कठिण जात आहे.

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान.

तेजश्रीचा फोटो पाहून चाहत्यांनीही तिला ओळखले नसल्याचे कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तेजश्री सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

गेल्या काही दिवसांत तेजश्रीने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.

विविध स्टाईलमधील तेजश्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.

मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते.

फोटोंमध्ये तेजश्रीच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.

काही फोटोमध्ये तेजश्रीचा निरागसपणा दिसून येत आहे.

आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत तेजश्रीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.