ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 01:06 PM2021-05-30T13:06:01+5:302021-05-30T13:20:20+5:30

Maharashtra's Most Desirable Women 2020 : महाष्ट्रातील टीव्हीवरील सर्वाधिक आकर्षिक आकर्षक महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या यादीत कुणी बाजी मारली, ते सुद्धा पाहा...

तुमची आमची आवडती ‘शुभ्रा’ अर्थात तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक टीव्ही अभिनेत्री ठरली आहे. टीव्ही विश्वातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत ती प्रथम क्रमांकावर आहे.

या यादीत दुस-या क्रमांकावर अभिनेत्री पल्लवी पाटील आहे. ट्रिपल सीट, बॉइज 2 या सिनेमात झळकलेली आणि जिगरबाज या मालिकेत दिसलेली पल्लवी पाटील या यादीत दुस-या क्रमांकारवर आहे.

देवमाणूस मालिकेतील दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खान या यादीत तिस-या स्थानावर आहे. शिकारी या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

जाडूबाई जोरात, माझ्या नव-याची बायको आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जग्गनाथ ही चौथ्या स्थानावर आहे.

अभिनेत्री नयना मुके ही पाचव्या स्थानावर आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत तिने लक्ष्मीदेवीची भूमिका यादगार ठरली होती.

माझ्या नवºयाची बायको या मालिकेतील शनाया अर्था अभिनेत्री रसिका सुनिल ही या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

नव्या दमाची, स्टायलिश तन्वी मुंडले ही या यादीत सातव्या स्थानावर आहे.

स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा, साजणा, आॅलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील पूजा बिरारी ही आठव्या स्थानावर आहे.

माझा होशील ना मधील सई अर्थात अभिनेत्री गौतमी देशपांडे ही नवव्या क्रमांकावर आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही 10 व्या स्थानावर आहे.

लागीरं झालं जी या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूर्वा शिंदे ही 11व्या स्थानावर आहे.

अभिनेत्री ईशा केसकर ही 12 व्या स्थानावर आहे.