‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची माधवी भाभी ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहाल तर व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:52 PM2020-07-20T12:52:30+5:302020-07-20T13:03:13+5:30

माधवी भाभीची गोष्ट काही औरच...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. पण भिडे वहिनी अर्थात माधवी भाभीची गोष्ट काही औरच. ख-या आयुष्यात माधवी भाभी प्रचंड ग्लॅमरस आहेत.

माधवीचे मराठी बोलणे तर प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेत मंदार चांदवलकर आत्माराम भिडेची तर सोनालिका जोशी माधवी भिडेची भूमिका साकारते.

सोनालिका ही एक मराठी मुलगी असून तिने मराठी रंगभूमीपासूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने तिच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण मिळवून दिले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

आज प्रेक्षक सोनालिकाला माधवी याच नावाने ओळखू लागले आहेत.

सोनालिका ही खूपच चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक लेखिका देखील आहे. तिला लिखाण करायला खूपच आवडते.

सोनालिकाला गाड्यांची प्रचंड आवड आहे.

सोनालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसठी रोज 25 हजार रूपये फी घेते.

गेल्या 12 वर्षांपासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करतेय.

सोनालिका विवाहित आहे. 5 एप्रिल 2004 रोजी तिने समीर जोशीशी लग्न केले. तिला आर्या नावाची एक मुलगी आहे.