भिडे मास्तरची मुलगी सोनूने एका व्यक्तीसाठी स्वतःमध्ये केला बदल, पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 11:53 AM2021-11-19T11:53:24+5:302021-11-19T12:02:25+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली सोनू म्हणजेच निधी भानुशाली सध्या प्रचंड चर्चेत आहे.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतात.

पूर्वी कधीही पाहिला नसेल इतका बोल्ड अंदाज पाहून चाहतेसुद्ध आश्चर्यचकीत झाले आहेत.

ऑनस्क्रीन साधी सरळ दिसणारी सोनू म्हणजेच निधीचे बोल्ड ट्रान्सफॉर्मेशन पाहून भलेभेलही आवाक झाले आहेत.

मुळात सोनू इतकी कशी बदलली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर.

एक व्यक्तीमुळे तिने स्वतःत इतका बदल केला आहे.

होय, खरंय,निधीने तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमाखातर स्वतःमध्ये बदल केल्याचे तुम्हालाही तिचे फोटो पाहून स्पष्ट होईल.

सतत ती एका व्यक्तीसोबत फोटो शेअर करत असते.

फोटोत दिसणारा मिस्ट्री बॉय तिचा बॉयफ्रेंड असल्याचे चाहते तर्कवितर्क लावताना दिसत आहेत.

इतकंच काय तर मध्यंतरी जीममध्ये साडी नेसून ती वर्कआऊट करताना दिसली होती.

याच कारणामुळे तिला जबदरदस्त ट्रोलही केले गेले होते.