रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस आहे ‘तारक मेहता...’ची बबिता, फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:18 PM2020-03-12T12:18:14+5:302020-03-12T12:42:30+5:30

कधी काळी या अभिनेत्यावर जडला होता बबिताचा जीव...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबितावर केवळ जेठालालच नाही तर प्रेक्षकही फिदा आहेत. मालिकेत बबिता बरीच सिंपल आहे. पण रिअल लाईफमध्ये म्हणाल तर मी खूप ग्लॅमरस आहे.

बबिताचे नाव मुनमुन दत्ता आहे. मुनमुनचे सोशल अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.

मुनमुन दत्ता व जेठालाल अर्थात दिलीप जोशी याआधी ‘हम सब बाराती’ या मालिकेत एकत्र दिसले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी कास्टिंग सुरु असताना दिलीप जोशी यानेच मुनमुनचे नाव सुचवले होते.

खरे तर ग्लॅमरस मुनमुनचा अ‍ॅक्टिंगमध्ये येण्याचा कुठलाही इरादा नव्हता. तिला डॉक्टर व्हायचे होते.

2008 मध्ये तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता अय्यरची भूमिका मिळाली.

त्यापूर्वी 2005 मध्ये प्रदर्शित ‘मुंबई एक्स्प्रेस’ या चित्रपटात ती कमल हासन यांच्यासोबत दिसली दिसली.

कधीकाळी मुनमुन अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी मुनमुन व अरमान यांच्या भांडण झाले. यादरम्यान अरमानने मुनमुनला मारहाण केली होती.

हे प्रकरण नंतर पोलिस ठाण्यात पोहोचले होते.