'मराठी बिग बॉस सिझन ३' मध्ये झळकणार प्रसिद्ध कपल, ब्रेकअपनंतर आहेत प्रचंड चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:57 PM2021-07-01T18:57:51+5:302021-07-01T19:03:48+5:30

अभिनेत्री अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले.अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती.तर दुसरीकडे 'का रे दुरावा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुयश टिळकसोबत अक्षयाचे अफेअर होते.

या दोघांनी कधीच आपले नात्याविषयी मनमोकळेपणाणे कबुली दिली नव्हती.मात्र सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.

त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.तितकीच ब्रेकअपचीही चर्चा झाली होती.दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना अनफॉलोही केले होते.

ब्रेकअप नंतर दोघांनी सोशल मीडियाव खासगी आयुष्याबद्दल कसलीच माहिती शेअर केली नव्हती. दोघांंचे ब्रेक अप झाल्याचे कळताच त्यांचे चाहतेही नाराज झाले होते.

अक्षया आणि सुयश टिळक दोघांचे ब्रेकअपचे कारण समोर आले नसले तरी चाहत्यांना मात्र मोठा धक्काच बसला होता. 'बिग बॉस मराठी' पर्व 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अनेक स्पर्धकांची नावही समोर आली.

समोर आलेल्या लिस्टमध्ये आता अक्षया आणि सुयश दोघेही शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.यापूर्वी झालेल्या मराठी बिग बॉसमधून काही कलाकरांची लव्हस्टोरी जगासमोर आली होती.

त्यामुळे आगामी भागात आता सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांचीही लव्हस्टोरी आणि ब्रेकअप स्टोरी समोर येणार हे मात्र नक्की.