Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरी पुन्हा होणार शिर्केपाटलांची सून; जयदीपसह संपूर्ण कुटुंब फॉलो करणार रेट्रो लूक थीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:49 PM2021-11-24T15:49:40+5:302021-11-24T15:58:15+5:30

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.

शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखिल अगदी थाटात पार पडणार आहे.

प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल. लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमके कसा असणार याची उत्सुकता आहे.

प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय

माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक धारण केला आहे.

जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत.

तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात.

मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

तर अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात.

संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

खरेतर खूप काळानंतर आणि खूप संघर्षानंतर शिर्केपाटील कुटुंब आनंदात आहे. त्यांच्या या आनंदात प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हावं अशी इच्छा आहे.