नवी मालिका, नवी कास्ट! पाहा ‘लग्नाची बेडी’ मालिकेत कोण साकारणार कोणती भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:00 AM2022-01-26T08:00:00+5:302022-01-26T08:00:07+5:30

Lagnachi Bedi : येत्या 31 जानेवारीपासून स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘लग्नाची बेडी’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. आता मालिकेतील कलाकारांची तोंडओळख तर व्हायलाच हवी... तेव्हा पाहा तर...

‘लग्नाची बेडी’ ही मालिका हिंदीतील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेचा मराठी रिमेक आहे. ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत सायली देवधर ही मुख्य नायिका म्हणून दिसणार आहे. अलीकडे ‘वैदेही’ या मालिकेत तुम्ही तिला पाहिलं असेलच. तीच आता या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

अभिनेता संकेत पाठक या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. यात तो राघव रत्नपारखी या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेद्वारे संकेत दोन वर्षानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय.

अनेक मराठी व हिंदी मालिकेत, चित्रपटात झळलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमुखी पेंडसे यांचीही ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्या या मालिकेत रुक्मिणी रत्नपारखीची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘आई कुठे काय काते’ या मालिकेत गौरीची आई रजनी कारखानीसची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर या नव्या मालिकेत ऋतुजा रत्नपारखीचं पात्र साकारताना दिसणार आहेत.

स्वामिनी मालिकेत मोठ्या रमाबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले ही सुद्धा ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत झळकणार आहे. ती यात मधुराणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेत्री रसिका धामणकर या मालिकेत राजश्री रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

अभिनेत्री मीनल बाळ हिची सुद्धा या मालिकेत महत्त्वाची भूमिका आहे. ती या मालिकेत रजनी रत्नपारखीच्या भूमिकेत असणार आहे.

अभिनेता गंधार खरपुडीकर रिषभ रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.