सिद्धार्थ शुक्ला नंबर 1! यंदाही ठरला टीव्हीवरचा मोस्ट डिझायरेबल मॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:53 PM2021-06-11T17:53:25+5:302021-06-11T18:01:52+5:30

Sidharth Shukla is most desirable man : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता, बिग बॉसच्या 13 व्या सीझनचा विजेता हँडसम हंक सिद्धार्थ शुक्ला सध्या जाम खूश आहे. कारणही तसेच आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता, बिग बॉसच्या 13 व्या सीझनचा विजेता हँडसम हंक सिद्धार्थ शुक्ला सध्या जाम खूश आहे. कारणही तसेच आहे.

होय, यंदा सिद्धार्थ शुक्ला टीव्हीवरील मोस्ट डिझायरेबल मॅन ऑन टीव्ही ठरला आहे.

शाहीर शेख आणि पार्थ समथान यांना मागे पछाडत हे स्थान पटकावलं आहे. टाईम्सच्या टॉप 20 मोस्ट डिझायरेबल मॅन 2020 यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.

टीव्हीवरील 20 सर्वाधिक लोकप्रिय पुरुष अभिनेत्यांची ही यादी आहे. अभिनेत्यांची लोकप्रियता, ऑनलाइन मतदान आणि ज्युरींची मते यांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.

टाईम्सच्या टॉप 20 मोस्ट डिझायरेबल मॅन 2020 च्या यादीत पार्थ समथान दुस-या क्रमांकावर आहे. अली गोनी तिस-या तर शाहीर शेख चौथ्या क्रमांकावर आहे.

मोहसिन खान पाचव्या, शिवीन नारंग सहाव्या, शरद मल्होत्रा सातव्या तर आसिम रियाज आठव्या क्रमांकावर आहेत.

सिद्धार्थ गेल्या वषीर्ही टीव्हीवर टाइम्स मोस्ट डिझायरेबल मॅन होता. तरूणाईमध्ये विशेषत: तरूणींमध्ये सिद्धार्थची अफाट लोकप्रियता आहे.

टाईम्सच्या टॉप 20 मोस्ट डिझायरेबल मॅन 2020 च्या यादीत अव्वल स्थान मिळाल्यानंतर सिद्धार्थ आनंदात आहेत. जाम खूश आहे.

कोणाला सर्वांत आवडती व्यक्ती ठरायला आवडणार नाही. मला कायम या स्थानावर राहायला आवडेल. यंदाही हे स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण मी माझं काम आनंदानं करतो. प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. त्यांच्या प्रेमामुळेच मला हे शक्य झालं आहे, असे तो म्हणाला.

सिद्धार्थनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांच्या उदंड प्रेमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले आहेत. त्यानं ‘दिल से’ असं लिहून नमस्काराचा इमोजी टाकला आहे.

Read in English