Shweta Tiwari ने चाहत्यांनाच नाहीतर मुलगी पलक तिवारीलाही केले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:22 PM2022-01-11T19:22:44+5:302022-01-11T19:43:03+5:30

श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठीही ती ओळखली जाते.तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. दोन मुलांची आई असलेल्या श्वेता तिवारीने स्वत:ला ज्या प्रकारे मेटेंन केलंय ते पाहून भल्याभल्याची बोलती बंद होते.

जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका,श्वेताला जे आवडते ते ती करते.

स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं.

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच श्वेता बिनधास्त मॉमही आहे.

श्वेताची तुलना सध्या तिची मुलगी पलक तिवारीसोबत होताना दिसते.

इतकंच काय तर श्वेता सौंदर्य आणि परफेक्ट फिगरमध्येही मुलीला टक्कर देते.

श्वेता ४१ वर्षाची असली तरी तिच्या फोटोंकडे पाहिले असता आपल्याला तिच्या वयाचा अंदाजा लावणे मुश्किल आहे.

श्वेताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की तिच्या फिटनेसबाबत ती किती जागरुक आहे.

त्यामुळेच की काय श्वेताचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

श्वेताचे सौंदर्य पाहून चाहतेही लाईक्स कमेंट्स करत पसंती देताना दिसतात.