SEE PICS : कधीकाळी 500 रूपयांची नोकरी करायची श्वेता तिवारी, इतक्या वर्षांत इतकी बदलली

By रूपाली मुधोळकर | Published: October 4, 2020 08:00 AM2020-10-04T08:00:00+5:302020-10-04T08:00:02+5:30

‘प्रेरणा’ या नावाने घराघरात लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा आज वाढदिवस.

‘प्रेरणा’ या नावाने घराघरात लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा आज वाढदिवस.

मुळची बिहारची असलेल्या श्वेता तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरपेक्षा पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली.

श्वेताने वयाच्या 12 वर्षीच एका ट्रव्हल कंपनीत पहिली नोकरी केली होती. यासाठी तिला महिन्याला 500 रूपये मिळत. हिच श्वेता आज टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नाव आहे.

2001 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने श्वेताला खरी ओळख दिली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती.

2004 मध्ये बॉलिवूडमध्येही तिने पदार्पण केले. त्यावर्षी बिपाशा बासू स्टारर ‘मदहोशी’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.

यानंतर आबरा का डाबरा, मिले ना मिले हम या चित्रपटांतही ती झळकली. याशिवाय अनेक भोजपुरी सिनेमांतही तिने काम केले.

याशिवाय अनेक शो तिने होस्ट केले, अनेक जाहिरांतीमध्ये काम केले.

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केले मात्र तिचे हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही.

राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्वेता घटस्फोटावर बोलली होती. घटस्फोटानंतर एका बाईला कुठल्या मानसिक आंदोलनातून जावे लागते, याची कल्पना तुम्ही करू शकता. मी सुद्धा या सगळ्यांतून गेले. पण सतत या घटस्फोटाबद्दल विचार करत बसायला, रडत बसायला माझ्याजवळ वेळ नाही. कारण माझ्या घरात मी एकटी कमावणारी आहे. त्यामुळे मी डिप्रेस होऊ शकत नाही. निश्चितपणे माझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. मात्र मला यातून बाहेर यावेच लागणार आहे. माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत. अनेक लोकांची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी स्ट्रेस किंवा दु:खात राहू शकत नाही. माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे, असे ती म्हणाली होती.