PHOTOS: राजेश वागलेची लेक सखी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा चिन्मयी साळवीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:00 PM2022-05-19T18:00:00+5:302022-05-19T19:46:12+5:30

राजेश वागलेच्या मुलीची भूमिका साकरणारी सखी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे.

छोट्या पडद्यावरील 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से' रोमांचक ट्विस्‍ट्ससह वागलेच्‍या जीवनातील दैनंदिन घटनांना सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.(Photo Instagram)

या मालिकेत राजेश वागलेच्या मुलीची भूमिका अभिनेत्री चिन्मयी साळवी साकरतेय. (Photo Instagram)

वागले की दुनिया मालिकेत सिंपल लूकमध्ये दिसणारी सखी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे हे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर लक्षात येतं.(Photo Instagram)

चिन्मयी साळवीने ‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे (Photo Instagram)

पण तिला खरी ओळख मिळाली ती 'वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेमुळे. (Photo Instagram)

चिन्मयी साळवी आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. (Photo Instagram)

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Instagram

येरे येरे पावसा’ या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकारत आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे. (Photo Instagram)

अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयी नृत्य कलेत ही निपुण आहे. तिने दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल या सारख्या स्पर्धेंची ती विजेती आहे. (Photo Instagram)

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता. (Photo Instagram)