IN PICS: काय आहेत या सर्वांच्या लाडक्या टीव्ही स्टार्सची खरी नावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 08:00 AM2020-07-23T08:00:00+5:302020-07-23T08:00:02+5:30

रश्मी देसाई ते निया शर्मा.... या कलाकारांनी बदलली नावं

कित्येक बॉलीवूड कलाकारांनी आपली खरी नावे बाजूला ठेऊन खास चित्रपटसृष्टीकरीता नवीन, वेगळे नाव धारण केले. टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सही यात मागे नाहीत. ‘उतरन’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली रश्मी देसाई हिचे खरे नाव दिव्या देसाई आहे. एका प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्टच्या सल्ल्याने तिने दिव्या हे नाव बदलून रश्मी हे नवे नाव धारण केले.

अनीता हसनंदानी - कभी सौतन कभी सहेली, कसौटी जिंदगी की, काव्यांजली अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाºया अनीता हसनंदानी हिचे खरे नाव नताशा आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचे नाव बदलून अनीता ठेवले.

करणवीर बोहरा - दिल से दी दुआ, सौभाग्यवती भव, कुबूल है, नागीन 2 या मालिकेसाठी ओळखल्या जाणा-या करणवीर बोहराचे खरे नाव मनोज बोहरा आहे. करणवीरचे आजोबा सुपरस्टार मनोज कुमारचे मोठे फॅन होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नातवाचे मनोज असे नाव केले होते. मात्र करणवीरने इंडस्ट्रीत येताना नाव बदलले.

निया शर्मा- नागीन फेम अभिनेत्री निया शर्माचे खरे नाव नेहा शर्मा आहे. इंडस्ट्रीत येण्याआधी तिने तिचे नाव बदलले. निया हे नाव तिच्यासाठी लकी ठरले. आज निया एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दलजीत कौर- दलजीत कौरने दोन वर्षांपूर्वी तिचे निकनेम आॅफिशिअल नेम म्हणून घोषित केले होते. मुलासोबतचा एक फोटो शेअर करत तिने या नव्या नावाची घोषणा केली होती. दिवाळीच्या दिवशी जन्म झाल्याने तिचे नाव दिपा ठेवण्यात आले होते. इंडस्ट्रीत आल्यावर तिने हे नाव बदलून दिलजीत कौर ठेवले होते.

रिद्धिमा तिवारी - टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा तिवारीचे खरे नाव श्वेता आहे. इंडस्ट्रीत श्वेता तिवारी नावाची आधीच एक अभिनेत्री होती. त्यामुळे शिवाय न्युमरोलॉजिस्टच्या सल्ल्याने तिने आपले नाव बदलून रिद्धिमा ठेवले.

टिया वाजपेयी- घर की लक्ष्मी बेटिया या मालिकेत झळकलेली अभिनेत्री टिया वाजपेयीचे खरे नाव ट्विंकल आहे.

Read in English