'रंग माझा वेगळा' रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:50 PM2021-09-17T15:50:05+5:302021-09-17T16:03:24+5:30

'रंग माझा वेगळा' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका रेश्मा शिंदेने केली आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे.

या मालिकेतील रेश्माच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. खऱ्या आयुष्यात रेश्मा खूप ग्लॅमरस आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

रेश्मा शिंदेने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'चाहूल' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.