रामायणमधील सीतेने म्हणजेच दीपिका चिखलिया यांनी काही तासांत घेतला होता लग्नाचा निर्णय, अशी आहे त्यांची क्यूट लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 08:00 AM2020-06-04T08:00:00+5:302020-06-04T08:00:02+5:30

रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आणि या मालिकेतील स्टारकास्ट सध्या जाम चर्चेत आहे. विशेषत: रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल आणि माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया या नावांची तर जोरदार चर्चा आहे.

दीपिका सध्या मनोरंजन विश्वात फार अ‍ॅक्टिव्ह नाहीत. पण त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.

दीपिका यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत मी माझ्या नवऱ्याला कशी भेटलेली हे तुम्हाला माहीत आहे का असे फॅन्सना विचारले होते.

दीपिकाच्या या प्रश्नानंतर त्यांची लव्हस्टोरी जाणून घ्यायची इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली होती.

दीपिका यांनी आता सोशल मीडियाद्वारे त्यांची लव्हस्टोरी त्यांच्या फॅन्सना सांगितली असून त्यांची ही लव्हस्टोरी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

दीपिका यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'सुन मेरी लैला हा माझा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील एका दृश्यासाठी मला एका जाहिरातीचे चित्रीकरण करायचे होते. ही जाहिरात डोळ्याला लावल्या जाणाऱ्या काजळाची होती.

याच जाहिरातीच्या दरम्यान माझी त्यांच्यासोबत भेट झाली आणि केवळ दोन तासांच्या गप्पांमध्ये आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि घरातल्यांना जाऊन सांगितले की, आम्हाला लग्न करायचे आहे.

टॅग्स :रामायणramayan