जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस आहे ‘गौतमाबाई', बोल्ड फोटो पाहून उंचावल्या चाहत्यांच्याही भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:00 AM2021-08-01T06:00:00+5:302021-08-01T06:00:00+5:30

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर ‘गौतमाबाई’ भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेत मल्हार राव होळकर यांच्या पत्नी आणि अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत स्नेहलता रसिकांची भरघोस पसंती मिळवत आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही स्नेहलताची ही दुसरी ऐतिहासिक मालिका आहे.

याआधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून स्नेहलता झळकली आहे.

स्नेहलताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

सध्या गौतमाबाईंची भूमिका साकारणारी स्नेहलता वसईकर खर्‍या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे.

स्नेहलता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती नेहमी आपले नवनवीन फोटो चाह्त्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच स्नेहलताने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत आहेत.

मालिकेत दिसणारी स्नेहलता जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे.

मालिकेत नेहमी पारंपरिक पेहरावात दिसणारी स्नेहलताचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.

ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.