या अमेरिकन रेसलरने राखी सावंतला दिली धोबीपछाड, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:02 PM2018-11-14T12:02:52+5:302018-11-14T12:07:53+5:30

अलीकडे ड्रामा क्विन राखी सावंतला एका अमेरिकन महिला रेसलरने अशी काही धोबीपछाड दिली की, राखी सावंत थेट रूग्णालयात पोहोचली. आज आम्ही राखीला धोबीपछाड देणाºया त्या महिला रेसलरबदद्ल सांगणार आहोत.

photos-wrestler-rebel-aka-tanea-brooks-throw-rakhi-sawant-in-the-ring

चाळीशीतील रैवेलने राखीला ज्याप्रकारे उचलले आणि जमिनीवर आपटले, यावरून तिच्या फिटनेसचा अंदाज तुम्हाला आला असेलच.

रैवेलचा जन्म ८ सप्टेंबर १९७८ रोजी ओवासो ओक्लाहोमा येथे झाला. रैवेल एक प्रोफेशनल अमेरिकन रेसलर तर आहेच. याशिवाय मॉडेल, अभिनेत्री व डान्सरही आहे.

२ नोव्हेंबर २०१६मध्ये तिने पहिल्यांदा ओव्हीडब्ल्यू वुमन्स चॅम्पियनशिप जिंकली होती. रैवेल आत्तापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे आणि अनेक चॅम्पियनशिप तिने जिंकल्या आहेत.

तानिया बु्रक्स मे २०१४ मध्ये रैवेल नावाने फेमस झाली होती आणि तेव्हापासून याच नावाने ओळखली जावू लागली.