निया शर्मा नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:35 AM2021-02-01T11:35:02+5:302021-02-01T11:44:02+5:30

अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पुन्हा तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या नवीन फोटोंनी सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतंच निया शर्माने फोटोशूट केलं आहे. याच फोटोशूटमधील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

निया शर्मा अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोलही होताना दिसते.

सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं नियाला आवडतं.

बऱ्याचदा नियाची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते.

कधी तिच्या विचित्र फॅशन एक्सप्रिमेंटमुळेही तिच्यावर नेटीझन्स निशाणा साधताना दिसतात.

मात्र या सगळ्या ट्रोलिंगचा नियाला अजिबात फरक पडत नसल्याचे दिसते.

ती आजही तितक्याच बोल्ड आणि ग्लॅमरस पद्धतीने तिचे फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.

तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.

तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.