PICS : याचीही काय गरज होती? निया शर्माचे व्हाईट जॅकेटमधील फोटो पाहून संतापले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:17 PM2021-02-12T16:17:56+5:302021-02-12T16:31:51+5:30

निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते.

‘नागीन’ फेम निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे निया ट्रोलही होते. पण निया ट्रोलर्सची अजिबात पर्वा करत नाही.

आपल्या अदांनी रिझवणा-या नियाने नुकतेच काही फोटो शेअर केलेत आणि तशी पुन्हा ट्रोल झाली.

या फोटोत नियाने एक व्हाईट कलरचे जॅकेट कॅरी केले आहे. नियाच्या काही चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रशंसाही केली.

नियाचा हा लूक काही चाहत्यांना मात्र खटकला आणि त्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

याचीही काय गरज होती. इतका शौक आहे दाखवण्याचा तर तेही काढून टाक, असे आक्षेपार्ह भाषेत काहींनी तिला ट्रोल केले.

निया सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण तिच्या चाहत्यांचीही संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन;च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.