नेहा पेंडसे झाली सिलेक्टिव्ह, बोल्ड सीन्स देणार पण एका अटीवर, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:47 PM2021-03-26T14:47:26+5:302021-03-26T14:59:35+5:30

Neha Pendse Big Statement On Bold Scenes In Movie: एका मुलाखतीत नेहा पेंडसेने तिच्या लग्नापासून ते करिअरपर्यंत सगळ्या गोष्टींवर मनमोकळेपणाणे गप्पा मारल्या. याच दरम्यान तिने बोल्ड सीन्स करण्यावरही तिचे मत मांडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नेहा पेंडसे तिच्या लग्नामुळे फार चर्चेत आहे.

लग्नानंतर नेहा पेंडसे आता 'भाभीजी घर पर है' मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत झळकत आहे.

विशेष म्हणजे लग्नानंतर नेहा पेंडसे आता फार सेलिक्टीव्ह झाली आहे.

सरसकट ऑफर्स मिळतात म्हणून काम करायचे असे नाही तर त्यातही तिने चॉईस ठेवली आहे.

विशेष म्हणजे बोल्ड सीन्स देण्यावरही तिने तिचे मतं मांडले आहे.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं.

योग्य प्रकारे दाखवले तर ते चांगले वाटते.

काही सिनेमांमध्ये उगाच गरज नसताना बोल्ड सीन्स जबरदस्तीने टाकला जातो.

भूमिकेची गरज असेल आणि वल्गर वाटणार नाही असे सीन्स द्यायला हरकत नाही.

बोल्ड सीन्स हे चांगलेही असतात, फक्त दाखवण्याची पद्धत योग्य असेल तर कोणालाच त्यात वावगं असे काही वाटणार नाही.