छोट्या पडद्यावरील ही संस्कारी बहू बोल्डनेसमध्ये देतेय सनी लियोनी, पूनम पांडेला टक्कर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:42 PM2020-05-23T14:42:32+5:302020-05-23T14:53:26+5:30

मेघा गुप्ताने काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई हूं, ड्रीम गर्ल आणि यहा मै घर घर खेली या मालिकांमध्ये काम केले आहे.

मेघाने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता कुमकुम या मालिकेमुळे मिळाली.

मेघा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे बोल्ड अँड हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मेघाच्या इन्स्टाग्रामला तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणात फॉलो करत असून तिचा बोल्ड अंदाज त्यांना आवडत असल्याचे कमेंटच्या माध्यमातून नेहमीच सांगतात.

मेघाचे लग्न अभिनेता सिद्धांत कर्णिकसोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्या दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

मेघा आणि सिद्धांतने 2016 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. मेघाचे हे दुसरे लग्न होते.

मेघाचे पहिले लग्न ‘शादी फेम’चा मालक आदित्य श्रॉफ सोबत झाले होते. पण हे देखील लग्न फार काळ टिकू शकले नव्हते.

मेघाने अनेक मालिकांमध्ये संस्कारी बहूची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.