'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाचा राजेशाही थाट, प्रार्थना बेहरेच्या साडीतील अदांवर चाहते फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:35 PM2022-06-30T16:35:25+5:302022-06-30T16:47:08+5:30

Prarthana Behere : प्रार्थना बेहरेच्या साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम करताना दिसते आहे.

प्रार्थना बेहरे या मालिकेत नेहाची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच प्रार्थना बेहरे हिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

गुलाबी रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाउज प्रार्थना बेहरे हिने परिधान केला आहे.

प्रार्थना बेहरे हिने गुलाबी रंगाच्या साडीवर नाकात नथ आणि गळ्यात नेकलेसने तिचा लूक पूर्ण केला आहे.

प्रार्थना बेहरेचा साडीतील हा लूक चाहत्यांना खूपच भावतो आहे.

प्रार्थना बेहरेचे साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

प्रार्थना बेहरे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

प्रार्थना बेहरेचे इंस्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.