PHOTOS : अभिनेत्री रिद्धी डोगरा अचानक आली चर्चेत, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:00 AM2021-03-18T08:00:00+5:302021-03-18T08:00:07+5:30

अनेकांना ठाऊक नसेल पण रिद्धी ही दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भाची आहे.

छोट्या पडद्यावरची गुणी अभिनेत्री रिद्धी डोगरा सध्या ‘द मॅरिड वुमन’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये रिद्धीने बोल्ड भूमिका साकारली आहे.

‘द मॅरिड वुमन’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. यात रिद्धी मुख्य भूमिकेत आहे. लेस्बियन संबंधावर आधारित ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अनेकांना ठाऊक नसेल पण रिद्धी ही दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भाची आहे.अरूण जेटली यांच्या पत्नी रिद्धिची आत्या आहे.

रिद्धी अरुण जेटली यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसायची. पण रिद्धीने कधीच याचा गवगवा केला नाही.

रिद्धीला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते. एका चॅनलमध्ये जॉब करत असताना तिला एक जाहिरात आॅफर झाली आणि ही जाहिरात पाहून एका मालिकेसाठी तिचा विचारणा झाली. इथून तिचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास सुरु झाला.

झुमे जिया रे, हिंदी है हम, लगी तुझसे लगन, मर्यादा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये रिद्धीने काम केले आहे.

रिद्धीने अभिनेता राकेश बापटसोबत लग्न केले होते. मात्र आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.

रिद्धी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करताना दिसते.

टीव्हीची स्टाईलिश अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. इन्स्टावरचे तिचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला याचा अंदाज येईल.

रिद्धीची ‘असूर’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली होती. आता तिची ‘द मॅरिड वूमन’ ही वेबसीरिजही चर्चेत आहे.