'या सुखांनो या'मधील कस्तुरी आठवते का? अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:30 PM2021-12-06T14:30:00+5:302021-12-06T14:30:00+5:30

Sharvari lohokare: अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटातही शर्वरी झळकली आहे. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि कतरिनासोबत स्क्रीन शेअर केली आहे.

एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'या सुखांनो या'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.

उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे लोकप्रिय ठरलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

या सुखांनो या मालिकेत विक्रम गोखले, शर्वरी लोहकरे, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे असे अनेक दिग्गज कलाकार झळकले.

या मालिकेत झळकलेल्या कलाकारांमध्ये आज कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळेच या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या शर्वरी लोहकरेविषयी जाणून घेऊयात.

'या सुखांनो या' मालिकेत शर्वरीने कस्तुरी ही भूमिका साकारली होती. ही भूमिका त्याकाळी तुफान गाजली. विशेष म्हणजे आजही अनेक जण शर्वरीला कस्तुरी याच नावाने ओळखतात.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असतांना शर्वरीला ही भूमिका ऑफर झाली होती.

या भूमिकेमुळे शर्वरी घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे या मालिकेनंतर शर्वरी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकली आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटातही शर्वरी झळकली आहे. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि कतरिनासोबत स्क्रीन शेअर केली आहे.

'सूर्यवंशी'मध्ये शर्वरीने, वंदना तांबे ही भूमिका साकारली आहे. सूर्यवंशी हा तिचा पहिलाच चित्रपट असून उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर तिने हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली.

सूर्यवंशीनंतर शर्वरी लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली शर्वरी अनेकदा तिच्या नव्या मालिका, चित्रपटांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

शर्वरीमध्ये आज कमालीचा बदल झाला असून तिला पटकन ओळखणं देखील कठीण आहे.

शर्वरीला फिरण्याची प्रचंड आवड असून ती अनेकदा नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.