अशोक सराफ यांच्या सख्या भावाला कधी पाहिलंय का? सोशल मीडिया अन् कलाविश्वापासून असतात कायम दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:40 PM2022-06-24T12:40:26+5:302022-06-24T12:45:04+5:30

Ashok saraf:अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाचं नाव सुभाष सराफ असं असून पहिल्यांदाच या दोन भावांना एकत्र पाहायला मिळणार आहे.

उत्तम अभिनयशैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ.

धुमधडाका, सगळीकडे बोंबाबोंब, वाजवा रे वाजवा, चौकट राजा अशा कितीतरी चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

अलिकडेच अशोक मामांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. मोठ्या धुमधडाक्यात हा सोहळा साजरा करण्यात आला.

विशेष म्हणजे आजही अशोक सराफ कलाविश्वात सक्रीय असून त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.

अशोक सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ लवकरच कोण होणार करोडपती च्या मंचावर हजेरी लावणार आहे. त्यामुळे त्यांची सध्या चर्चा आहे. मात्र, त्यांच्यासोबत त्यांच्या भावाचीही चर्चा रंगताना पाहायला मिळते.

या मंचावर त्यांच्यासोबत त्यांचा सख्खा भाऊदेखील उपस्थित राहणार आहे.

अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाचं नाव सुभाष सराफ असं असून पहिल्यांदाच या दोन भावांना एकत्र पाहायला मिळणार आहे.

सुभाष सराफ हे व्यवसायाने सीए असून ते गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत.

कोण होणार करोडपतीच्या मंचावर अशोक आणि सुभाष ही भावंडं त्यांच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा देणार आहे.