इंद्राचा स्टायलिश अंदाज; राऊडी लूकमध्ये शेअर केले हटके फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:23 PM2022-05-24T19:23:57+5:302022-05-24T19:34:03+5:30

Ajinkya raut:इंद्राचं खरं नाव अजिंक्य राऊत असं असून मन उडू उडू झालं ही त्याची पहिली मालिका नाही. यापूर्वीही त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत.

उत्तम अभिनय आणि हँडसम असल्यामुळे अजिंक्य अल्पावधीत लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आज तो अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतो.

अजिंक्य सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

इंद्राचं खरं नाव अजिंक्य राऊत असं असून मन उडू उडू झालं ही त्याची पहिली मालिका नाही. यापूर्वीही त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

इंद्राचं खरं नाव अजिंक्य राऊत असं असून मन उडू उडू झालं ही त्याची पहिली मालिका नाही. यापूर्वीही त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

अजिंक्यने कॉलेजचं शिक्षण पुण्यातील डी.वाय. पाटीलमध्ये केलं आहे. तर शालेय शिक्षण हे परभणीत पूर्ण झालं आहे.

कोठारे व्हिजन निर्मित विठू माऊली या मालिकेतून त्याने स्मॉल स्क्रिनवर पदार्पण केलं आहे. तसंच तो प्रथमेश परबसोबत टकाटक - 2 मध्ये ही झळकला आहे.

अजिंक्यने अलिकडेच फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अजिंक्यने वेगवेगळ्या पोझ देत तरुणींचं लक्ष वेधून घेतलं आहे.