गुडन्यूज!! झाँसी की रानी फेम अभिनेत्री Kratika Sengarने दिला गोंडस बाळाला जन्म, बाबा झाला अभिनेता Nikitin Dheer

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:41 PM2022-05-12T19:41:54+5:302022-05-12T19:46:43+5:30

टीव्ही कपल निकितिन धीर आणि कृतिका सेंगर धीर यांच्या घरी एका छोट्या परीच आगमन झालं आहे. निकितिननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली.(Photo Instagram)

आता या आनंदाच्या बातमीने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कपलवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. (Photo Instagram)

कृतिकानं तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo Instagram)

निकितिननं 'शेरशाह', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच तो प्रसिद्ध अभिनेता पंकज धीर यांचा मुलगा आहे. (Photo Instagram)

निकितिनची पत्नी कृतिका सेंगर ही स्मोल स्क्रिनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'छोटी सरदारनी' या मालिकेमुळे कृतिका घराघरात पोहोचली. (Photo Instagram)

3 डिसेंबर 2014 रोजी निकितिन आणि कृतिका लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कृतिका आणि निकितिन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. (Photo Instagram)