इतकी सुंदर दिसते महेश कोठारे यांची पत्नी, लाईमलाईटपासून असते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:00 AM2021-09-21T09:00:00+5:302021-09-21T09:00:00+5:30

एक बालकलाकार ते अभिनेता आणि अभिनेता ते दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे निभावणारे कलाकार म्हणजे महेश कोठारे. धूमधडाका, झपाटलेला, दे दणादण, थरथराट असे एकाहून एक सरस सिनेमाचे दिग्दर्शन आणि अभिनेत्याची भूमिका पार पाडत त्यांनी मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले.

मराठी सिनेसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे कोठारे कुटुंब.

कोठारे कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते.

या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात.

प्रत्येक व्यक्तीविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो.

मुलगा आदिनाथ कोठारे, सून उर्मिला कोठारे हे चर्चेत असतात.

मात्र महेश कोठारे यांच्या पत्नी निलिमा लाइमलाइटपासूनच दूर राहणे पसंत करतात.

निलीमा कोठारे यांच्याविषयी चाहत्यांना फारशी माहिती नसली तरी सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहायला मिळतात.

निलिमा दिसायलाही फार सुंदर दिसतात.

त्यांच्या वयाचा अंदाज बांधणेही अशक्य होते. इतक्या त्या सुंदर दिसतात.