Bigg Boss 15: ईशानसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेली ‘बेफिक्रे’ मायशा अय्यर आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 03:47 PM2021-10-12T15:47:18+5:302021-10-12T15:56:06+5:30

Bigg Boss 15: ईशान सेहगल आणि मायशा अय्यर यांनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. रोमान्स असा की, तो पाहून चाहतेही खवळले आहेत...

बिग बॉस 15 च्या घरात एन्ट्री झाली आणि ती चर्चेत आली. आता काय तर सोशल मीडियावर तिला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. तिचं नाव मायशा अय्यर.

ईशान सेहगल आणि मायशा अय्यर यांनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. रोमान्स असा की, तो पाहून चाहतेही खवळले आहेत. नॅशनल टीव्हीवरचे असे अश्लिल चाळे बंद करा, अशा शब्दांत लोक संताप व्यक्त करत आहेत.

पहिल्याच आठवड्यात ईशानला किस करून मायशाने खळबळ माजवली आहे. दोघांचे एक ना अनेक रोमॅन्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मायशा कोण हे आम्ही सांगणार आहोत.

बिग बॉसच्या घरात गेलेली 25 वर्षांची मायशा मूळची मुंबईची. तिचे वडील मोठे बिझनेसमॅन आहेत आणि आई ही फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे.

मायशाने मुंबईमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनतर तिने मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला. ‘Ace of Space’ याद्वारे ती टीव्ही जगतात दाखल झाली.

त्यांनतर मायशाने ‘स्पिलट्सविला 12’ मध्येही दिसली होती. त्यातीलही वादविवादामुळे ती अनेकवेळा चर्चेत आली होती.

टीव्ही जगतात येण्याआधी मायशा अय्यर ही एका उद्योगपतीच्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात. अर्थात त्यांच्या नात्याचा शेवट फार वाईट आल्याचं समजतं.

रिपोर्टनुसार, मायशाने आपल्या बॉयफ्रेंड विरोधात पोलिसात तक्रार केली होती. तिने आपल्या बॉयफ्रेंडवर खंडणी, त्रास देणे आणि पाठलाग करणे असे अनेक आरोप लावले होते. तिचा एक व्हिडीओ वूटवर ‘ब्रेकअप स्टोरीस’ मध्ये पाहायला मिळतो.मात्र त्याच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा तिने खुलासा केलेला नाहीय.

त्यांनतर मायशा अय्यर ‘रोडीज’ फेम आशिष भाटीयासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हीच मायशा अय्यर सध्या बिग बॉस 15 मध्ये सहभागी झाली आहे.