ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:55 PM2021-06-25T16:55:38+5:302021-06-25T17:02:27+5:30

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

नुकतंच तिच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

याच खास क्षणाचे फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.

यावेळी उपस्थितांनी किश्वर आणि सुयश राय दोघांना आशीर्वाद,शुभेच्छा दिल्या.

आई होण्याचा आनंद किश्वरही लपवू शकली नाही.

यावेळी किश्वर कोडकौतुकात हरखून गेली होती.

किश्वर आणि सुयशच्या आयुष्यात ‘तान्हुल्या’ बाळाचा लवकरच आगमन होणार आहे.

आता दोघेही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आतुर आहेत.

किश्वरने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर करत आपला आनंद साजरा केला होता.

तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीदरम्यानच्या घडामेडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

किश्वर प्रेग्नंसी प्रचंड एन्जॉ करते. चेह-यावरही प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळतोय.

Read in English