भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मा झाला ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By रूपाली मुधोळकर | Published: November 22, 2020 11:43 AM2020-11-22T11:43:56+5:302020-11-22T11:48:15+5:30

भारतीनंतर आता कपिलचा नंबर?

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी शनिवारी कॉमेडियन भारती सिंह हिला अटक केली. पाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचिया यालाहीअटक करण्यात आली. भारतीच्या अटकेनंतर सोशल मीडियावर भारती पेक्षा कॉमेडियन कपिल शर्मा ट्रोल झाला.

होय, भारतीच्या अटकेनंतर नेटक-यांनी कपिल शर्माला असे काही ट्रोल केले की, दिवसभर सोशल मीडियावर कपिल शर्मा हे नाव ट्रेंड झाले.

कपिलवरचे अनेक मीम्स यानिमित्ताने व्हायरल झालेत.

भारतीनंतर आता पुढचा नंबर कपिल शर्माचा नंबर का? असा सवाल करत लोकांनी कपिलची मजा घेतली.

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात भारती आणि कपिल एकत्र काम करतात. याचमुळे कपिल शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

कपिल शर्माच्या कॉमेडी शोवर बहिष्कार टाकण्याची मागणीही अनेकांनी केली.

शनिवारी सकाळी एनसीबीने भारती सिंहच्या घरी आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून एनसीबीच्या अधिकाºयांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

भारतीला अटक झाल्यानंतर काही तासांनी तिचा पती हर्ष यालाही एनसीबीने अटक केली.

भारती व हर्ष दोघांनी गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दिली असल्याचे कळतेय.

आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Read in English