'जय मल्हार'फेम सुरभी हांडे आता काय करते माहितीये? अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:40 PM2022-01-20T13:40:00+5:302022-01-20T13:40:00+5:30

Surabhi hande: जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे जय मल्हार. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या मालिकेत देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि ईशा केसकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

ही मालिका संपून अनेक दिवस उलटले आहेत. परंतु, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळेच या मालिकेतील सुरभी आता काय करते हे जाणून घेऊयात.

जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.

या मालिकेनंतर सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकली. तसंच 'अग्गं बाई अरेच्चा 2' या चित्रपटातही छोटेखानी भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली सुरभी लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.

सुरभी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

सुरभीमध्ये आता कमालीचा बदल झाला असून ती दिवसेंदिवस आणखीनच सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळतं.

सुरभीचा जन्म 20 मे 1991 रोजी भंडारा येथे झाला. पण तिचं बालपण जळगावमध्ये गेलं. बारावी पर्यंतचे जळगावमध्ये शिकल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती नागपूरला आली.

वयाच्या १६ व्या वर्षी सुरभीने कलाविश्वात पदार्पण केलं. 16 व्या वर्षी तिने स्वामी या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली.