सहा महिन्यांच्या प्रेग्नंट पत्नीला सोडून गेले होते कुमार सानू; बिग बॉसच्या घरात मुलगा जान सानूने केला खुलासा

By रूपाली मुधोळकर | Published: October 9, 2020 01:13 PM2020-10-09T13:13:32+5:302020-10-09T13:22:19+5:30

वाचा काय म्हणाला जान?

90 च्या दशकात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सिंगर कुमार सानूचा मुलगा जान सानू सध्या ‘बिग बॉस 14’मुळे चर्चेत आहे. जान सानू बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आणि पहिल्याच आठवड्यात त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दलचा खुलासा केला.

माझी आई हीच माझ्यासाठी सर्व काही आहे. माझे वडीलही ती आणि माझी आई सुद्धा तीच, असे जान म्हणाला.

शोच्या एका एपिसोडमध्ये जास्मिन, सारा गुरवाल आणि अन्य स्पर्धकांसोबत बोलताना जान आईबद्दल भरभरून बोलला. माझ्या आईने एकटीने माझा सांभाळ केला. आई आणि वडील दोघांचीही भूमिका तिने एकटीने निभावली, असे जान यावेळी सांगतो.

माझी आई सहा महिन्यांची प्रेग्नंट असताना माझे पापा तिला सोडून गेलेत. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. माझ्या आईने एकटीने मला लहानाचे मोठे केले. माझ्या संगोपनात माझ्या वडीलांची कुठलीही भूमिका नव्हती, असेही जानने सांगितले.

बिग बॉसमध्ये येताना आईची काळजी कोण घेईल, याच चिंता होती, असेही त्याने सांगितले. जान हा कुमार सानूचा मुलगा आहे. जानची आई रिता ही कुमार सानूची पहिली पत्नी. त्यांचाच जान हा मुलगा.

जान हा २६ वर्षांचा आहे. परंतु तो त्याच्या नावापुढे कुमार सानू असे वडिलांचे नाव लावतो. जान कुमार सानूदेखील वडिलांप्रमाणे एक क्लासिकल ट्रेंड सिंगर आहे.

तारें जमीं पें या चित्रपटातील बम बम बोले हे गाणे जानने गायले आहे़ काही बंगाली सिनेमासाठीही त्याने गाणी गायली आहेत.

कुमार सानू यांनी दोनदा लग्न केले आहे. रीता हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. कुमार सानू व रिता यांना 1988 साली पहिला मुलगा जैसी झाला. यानंतर जीको व जान अशी आणखी दोन मुले झाली.

1994 साली रिता व कुमार सानू यांचा घटस्फोट झाला. तिन्ही मुलांची कस्टडी तिला मिळाली. कुमार सानूची ही तिन्ही मुले लाईमलाईटपासून दूर असतात.

1994 साली कुमार सानू यांनी सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरे लग्न केले. यांना 3 मुले आहेत. शॅनन, अ‍ॅना या दोन मुली आणि नाल कुमार जानू हा मुलगा. शॅननला कुमार सानू यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते.

Read in English