पतीपेक्षा अधिक श्रीमंत आहेत या टीव्हीच्या 7 नट्या, नात्यात कधीच आडवा आला नाही पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:29 PM2020-06-11T16:29:40+5:302020-06-11T16:47:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच लोकप्रिय असलेल्या अनेक टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. अगदी आपल्या पतीहूनही त्या अधिक लोकप्रिय आहेत. शिवाय पतीपेक्षा अधिक कमावणा-या टीव्हीच्या काही फेमस अ‍ॅक्ट्रेसबद्दलआम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दीपिका कक्कड - टीव्ही शो ‘ससुराल सिमर का’ मधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला सगळेच ओळखतात/ ‘बिग बॉस’ची विनर राहिलेल्या दीपिकाने शोएब इब्राहिमसोबत लग्न केलेय/ शोएबही अभिनेता आहे. पण शोएबपेक्षा दीपिका प्रचंड लोकप्रिय आहे. कमाईच्या बाबतीतही शोएबपेक्षा ती बरीच पुढे आहे.

दिव्यांका त्रिपाठी - ‘ये है मोहबते’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली दिव्यांका त्रिपाठी टेलिव्हिजनचा एक फेमस चेहरा. ‘ये है मोहबते’मध्ये तिचा पती विवेक दहिया देखील विलनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. लोकप्रियतेच्या बाबतीत दिव्यांका पती विवेकपेक्षा खूपच पुढे आहे आणि कमाईच्या बाबतीतही ती पतीपेक्षा सरस आहे.

भारती सिंह- टीव्ही जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा पती हर्ष लिम्बाचिया याला आधी फार कुणी ओळखत नव्हते. भारतीसोबत लग्न केल्यानंतर त्याला लोक ओळखू लागलेत. भारतीची लोकप्रियता आपल्याला माहित आहेच. कमाईच्या बाबतीत हर्ष तिच्यापुढे काहीही नाही.

सौम्या टंडन - भाभीजी घर पर है मधील गोरी मॅम अर्थात सौम्या टंडन पती पेक्षा खूपच प्रसिद्ध आहे. तिने आपला कॉलेजमधील मित्र सौरभ देवेंद्र सिंह सोबत लग्न केले आहे. आज सौम्या आपल्या पतीपेक्षा कमाईच्या बाबतीत खूपच पुढे आहे.

सनाया इराणी - सनाया इराणी भारतीय टेलिव्हिजनचा मोठा चेहरा आहे. 2016 मध्ये तिने अभिनेता मोहित सहगलसोबत लग्न केले. लोकप्रियता आणि कमाईच्या बाबतीत सनाया पतीपेक्षा बरीच पुढे आहे.

रुबीना दिलैक - टीव्ही जगताची प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक टीव्हीच्या अनेक शोमध्ये तुम्ही पाहिले असेल. 2018 मध्ये तिने अभिनव शुक्लासोबत लग्नगाठ बांधली. रूबीना लग्नाआधीच खूप फेमस होती. इतकी की रुबीना सोबत लग्न केल्यानंतर तिच्यामुळे अभिनवला लोकप्रियता मिळाली. कमाईच्या बाबतीतही ती अभिनवला मात देते.

संजीदा शेख : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख व आमिर अली हिने 2012 साली विवाहबंधनात अकडले. दोघांनीही क्या दिल में है, एक हसीना थी अशा अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र काम केले. पण खरी लोकप्रियता मिळाली ती संजीदाला. कमाईच्या बाबतीतही म्हणूनच ती आमिरपेक्षा बरीच पुढे आहे.

Read in English