हिना खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा तिच्या ग्लॅमरस अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:49 PM2021-01-28T14:49:47+5:302021-01-28T14:49:47+5:30

हिना खान टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर, १९८६ला श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला आहे.

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. यात तिने अक्षराची भूमिका साकारली होती.

नुकतेच हिना खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे.

या फोटोत हिना खानने ब्लॅक ड्रेस घातला असून त्यात ती ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.

हिना खान नेहमी इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. हिना खान बिग बॉस १४ मध्ये सीनियर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती.

हिना खानने हॅक्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२०१७ साली ती फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनरअप ठरली.

हिना खानचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ११ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.