IN PICS: हरियाणवी डान्सर सपना चौधरीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न;मुलाच्या जन्मानंतरही झाली होती ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:37 PM2022-05-12T15:37:55+5:302022-05-12T18:33:36+5:30

सपना तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असते.

आपल्या डान्समुळे अनेकांना वेड लावणारी हरियाणवी डान्सर म्हणजे सपना चौधरी (Sapna Chaudhary). आज सपनाकडे डान्सिंग क्वीन म्हणून पाहिलं जातं. सपनाची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. (Photo Instagram)

सपना तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असते. वाचा सपना चौधरीशी संबंधित अशा काही वादांबद्दल, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता. (Photo Instagram)

सपना चौधरी आयुष्य देखील अडचणींनी भरलेले आहे. एक वेळ अशी आली की तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ आली होती. सपनाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. (Photo Instagram)

सपना चौधरीने बिग बॉस 11 मध्ये एन्ट्री केली होती आणि बिग बॉसच्या घरातही ती अनेकदा वादात सापडली होती. (Photo Instagram)

वास्तविक, चाहत्यांना सपनाच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि जेव्हा मुलाच्या जन्माची बातमी समोर आली तेव्हा लोकांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिचा पती वीर साहू फेसबुकवर आला आणि ट्रोलर्सना खडसावले होते. (Photo Instagram)

सपना चौधरी 2018 साली 'वीरे की वेडिंग' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील 'हट जा तौ' हे गाणे रिक्रिएट करण्यात आले असून ते सपना चौधरीवर चित्रित करण्यात आले आहे. (Photo Instagram)

त्यानंतर हरियाणवी गायक विकास कुमारने सपना चौधरीसह चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टला 7 कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गायकाने सांगितले की या गाण्याचा कॉपीराइट आपल्याकडे आहे, म्हणून निर्मात्यांनी त्याच्याशी न बोलता हे गाणे पुन्हा तयार केले. (Photo Instagram)

सपना चौधरी स्टेज शो देखील करते आणि चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड क्रेझ आहे. 2018 मध्ये लखनऊमध्ये त्यांचा एक शो आयोजित करण्यात आला होता, ज्यासाठी प्रेक्षक तिकीट खरेदी करून शो पाहण्यासाठी आले होते.पण सपना कार्यक्रम करण्यासाठी तिथे पोहोचली नाही, त्यानंतर लोकांनी खूप गोंधळ घातला आणि तिकीटाचे पैसे परत मागितले होते. (Photo Instagram)

हरियाणाच्या नजफगढमध्ये जन्म झालेल्या सपनाने केवळ ८ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आगे. त्यानंतर तिने स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करण्यास सुरुवात केली.(Photo Instagram)

सपनाचं खरं नाव सुष्मिता असं आहे. मात्र, कलाविश्वात येण्यापूर्वी तिने तिचं नाव बदलून सपना असं केलं. सपना उत्तम डान्सर असण्यासोबतच एक सोशल मीडिया सेन्सेशनदेखील आहे..(Photo Instagram)