राणा-अंजली साथ साथ, फोटो पाहून दोघांनीही लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:12 PM2021-08-14T18:12:13+5:302021-08-14T18:20:31+5:30

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेले राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेतील त्यांचा अंदाज ही रसिकांच्या पसंतीस पत्र ठरला होता.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

हार्दिक आणि अक्षया देवधर या दोघांचे फोटो समोर आले आहेत.

दोघांचेही हटके लूक पाहून चाहते पसंती देत आहेत.

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने रसिकांची मनं जिकणारी ही जोडी ऑफस्क्रीनही रसिकांची पसंती मिळवत आहे.

दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते दोघांची जोडी 'नंबर १' असल्याचे बोलत आहेत.

इतकंच काय तर दोघांनीही लग्न करावे अशाच कमेंट त्यांच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.

हार्दिक आणि अक्षया दोघेही ऑनस्क्रीन झळकत नसले तरी आजही तितकेच रसिकांचे फेव्हरेट आहेत.

ऑफक्रीन असो किंवा ऑनस्क्रीन त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना आवडतो.

दोघांचा हटके लूकही चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.