'माझा होशील ना' मालिकेतल्या आदित्यचे ख-या आयुष्यात अभिनेत्रीसोबत सुरुय ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:00 PM2021-05-04T16:00:46+5:302021-05-04T16:04:45+5:30

'माझा होशील ना' मालिकेत सईवर लट्टू होणारा आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णीची शिवानी रांगोळे रिअल लाईफ सईतर नाही ना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आता या फोटोचं वास्तव काय आहे हे फक्त विराजस आणि शिवानीच सांगू शकतात. येत्या काळात या फोटोचे गुपितही नक्कीच समोर येईल.

मात्र या बातमीमुळे आदित्याची रिअल लाइफ सई बनण्याचं स्वप्न बघणा-या तिच्या फॅन्सचं हार्ट ब्रेक झालं असणार हे मात्र नक्की.

गेल्या अनेक दिवसांपासून ही जोड बऱ्याचदा सार्वजानिक ठिकाणी एकत्र जाते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघांचे अनेक फोटो आहेत.

एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो.

प्रत्येक क्षणाचे फोटो शिवानी आणि विराजस आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तसंच शिवानीने आणि विराजसने एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यामुळे चाहत्यांना आता यांच्या प्रेमाबद्दल संशयच नाही तर पूर्ण विश्वास बसला आहे.

अजूनतरी या लव्हबर्डने त्यांच्या प्रेमाबद्दल जाहीरपणे कबुली दिलेली नाही.