'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:00 AM2022-06-26T08:00:00+5:302022-06-26T08:00:00+5:30

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

आईचं महत्त्व सांगणारी आणि कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारी मालिका आहे ती म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte). या मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली.

मालिकेच्या कथानकालाच नाही तर त्यातील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र या मालिकेतील मुख्य आणि महत्त्वाचे पात्र म्हणजे अरुंधतीने प्रत्येक घरात आपलं स्थान निर्माण केलं. अरुंधतीच्या रिलच नाही तर रिअल लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणीच्या नवऱ्या आणि लेकीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

मधुराणीच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे अमृता गोखले-सहस्रबुद्धे (Amruta Gokhale-Sahastrabuddhe).

अमृता ही गायिका असून तिने झी मराठी वाहिनीवरील सारेगमपा शोच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. इतकेच नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.

याशिवाय अमृताचे स्वतःचे युट्यूब चॅनेल असून त्यावर बरीच कव्हर साँग्स ऐकायला मिळतील.

अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

अमृताच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तिचे आणि मधुराणीचे बरेच फोटो पाहायला मिळत आहेत.