प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:52 PM2022-05-21T15:52:37+5:302022-05-21T16:04:33+5:30

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री प्रिया मराठेचा पतीदेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. (Photo Instagram)

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे प्रिया मराठे आणि त्याच्या पतीची. (Photo Instagram)

प्रिया मराठे हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करते आहे. (Photo Instagram)

'या सुखांनो या' या मालिकेतून प्रिया मराठेने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केले. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका खूप गाजली. (Photo Instagram)

याशिवाय कसम से या मालिकेतून तिने हिंदी मालिकांमध्ये पदार्पण केले.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. 'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही ती झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही ती दिसली. (Photo Instagram)

प्रियाचा पतीही टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आई कुठे काय करते मालिकेत तो अनिरुद्धचा भाऊ अविनाश देशमुखची भूमिका साकारतो आहे. (Photo Instagram)

प्रिया पती शंतनु मोघेसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. चाहते नेहमी त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)

अभिनेता शंतनु मोघेने स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिके त छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. (Photo Instagram)

तसेच श्री राम समर्थ या चित्रपटात त्याने काम केले आहे. याशिवाय त्याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने नाटकातही काम केले आहे.(Photo Instagram)