मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, नवरात्री निमित्त केले स्पेशल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:33 PM2021-10-13T19:33:01+5:302021-10-13T20:31:56+5:30

नवरात्री निमित्त या अभिनेत्रीने स्पेशल फोटोशूट केले आहे.

फडकव निशाण स्वातंत्र्याचे, झुगारूनी कळसूत्री, उभी रहा पाय रोऊनी, हो तू 'शैलपुत्री '! स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांगणा भिकाजी रुस्तम कामा यांचा लूक करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे.

हो खुशाल विद्रोही तू, मिळवण्या स्वातंत्र्य संजीवनी, तू रणरागिणी ,वैरागिणी अन तूच ती ब्रह्मचारिणी. . .! बेगम हजरत महल यांचा लूक रिक्रिएट करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.

रेख तू अन लेख तू, स्वातंत्र्याच्या कैक छटा टाक पाऊले खंबीर तू, मग वाजतील चंद्रघंटा. . .! सरोजिनी नायडू यांचा लूक रिक्रिएट करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.

उठ पेटूनी न्यायासाठी, रक्त सळसळो तुझ्या गात्री स्वातंत्र्य सूर्य उगवू दे, हो पारतंत्र्याची कालरात्री . . .! वीरांगणा झलकारी बाई

तूच जननी विश्वाची, अन तूच प्रसविशी ब्रम्हांडा नाना लंकार भूषविशी, स्वातंत्र्याची तू कुष्मांडा. . .! वीरांगणा किट्टूर राणी चेन्नमा

तोड साऱ्या बेड्या दे झुगारून बंधने आता स्वातंत्र्याच्या सिंहावरची हो तू स्कंदमाता. . .! स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांगणा अहिल्याबाई होळकर

स्वातंत्र्याची मूर्ती तू , शौर्याची तू जननी वात्सल्याची महती तू, तूच माता कात्यायनी. . .! स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांगणा राणी लक्ष्मीबाई