दिव्यांका त्रिपाठीचे पती विवेक दहियासोबत रोमँटिक मूड, पाहा त्यांचे क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:00 AM2021-06-25T06:00:00+5:302021-06-25T06:00:00+5:30

टीव्ही इंडस्ट्रीतील दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

विवेकही दिव्यांकाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही.

त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

दिव्यांकाने पती विवेकसोबत खास फोटो क्लिक केले आहेत.

दोघेही सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.

या फोटोंमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.

याच फोटोशूटमधले निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

फोटो पाहून सारेच दोघांवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

दिव्यांकाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली तर विवेकनेही सुटमध्ये हँडसम दिसतोय.

विवेक आणि दिव्यांकाच्या या कॅन्डिड फोटोंनी सा-यांचं लक्ष वेधून घेतलं.

दोघंही प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहेत.