Bigg Boss मध्ये मिळालेल्या मानधनाचं काय करणार? तृप्ती देसाई म्हणतात...

By शर्वरी जोशी | Published: November 8, 2021 04:34 PM2021-11-08T16:34:46+5:302021-11-08T16:51:20+5:30

Trupti Desai : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांचा मोर्चा आगामी आंदोलनाकडे वळवला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात मिळालेल्या मानधनाचं काय करणार हे त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून पहिल्या दिवसापासून ते चांगलंच गाजत आहे.

नुकतीच बिग बॉसच्या घरातून तृप्ती देसाई यांची एक्झिट झाली आहे. रविवारी रंगलेल्या बिग बॉसच्या चावडीवर त्यांचा प्रवास शेवटचा ठरला.

जवळपास ५० दिवस या घरात राहून तृप्ती देसाई यांनी हे पर्व गाजवलं. विशेष म्हणजे त्यांच्या स्वभावाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहाता आली.

आंदोलनाच्या वेळी भांडण करणाऱ्या, आक्रमक होणाऱ्या तृप्ती देसाई खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून बिग बॉसच्या घरात त्यांच्यात दडलेली आई, जबाबदार मोठी बहीण, मैत्रीण अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांनी जवळून पाहिल्या.

आंदोलनाच्या वेळी भांडण करणाऱ्या, आक्रमक होणाऱ्या तृप्ती देसाई खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून बिग बॉसच्या घरात त्यांच्यात दडलेली आई, जबाबदार मोठी बहीण, मैत्रीण अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांनी जवळून पाहिल्या.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांचा मोर्चा आगामी आंदोलनाकडे वळवला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात मिळालेल्या मानधनाचं काय करणार हे त्यांनी लोकमत ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

तृप्ती देसाई यांचं बलात्कारमुक्त महाराष्ट्र हे नवीन आंदोलन लवकरच सुरु होणार आहे.

बलात्कारमुक्त महाराष्ट्र या नव्या आंदोलनासाठी, उपक्रमासाठी तृप्ती देसाई त्यांना मिळालेलं बिग बॉसचं मानधन वापरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान, बिग बॉसचं मानधन त्या समाजकार्यासाठी वापरणार असल्याचं समोर आलं आहे.