अशी धम्माल रंगली ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकुरची बॅचलर पार्टी

By रूपाली मुधोळकर | Published: November 9, 2020 03:48 PM2020-11-09T15:48:23+5:302020-11-09T16:01:14+5:30

SEE PICS: मैत्रिणींसोबत सईने केलेली धमालमस्ती

बिग बॉस मराठी 1 ची स्पर्धक अभिनेत्री सई लोकुरलवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधी बॅचलर पार्टी तर व्हायलाच हवी.

सईची धम्माल बॅचलर पार्टी नुकतीच साजरी झाली. या पार्टीचे फोटो तिने शेअर केले आहेत.

यावेळी सईने आपल्या मैत्रिणींसोबत छान आणि तितकेच हटके फोटोशूटही केले आहे. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत सई आपल्या मैत्रिणींसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे.

या फोटोशूटमध्ये सईने 'I m Getting Married' या मेसेजचे लाल रंगाचे टी शर्ट घातले आहे. तर तिच्या मैत्रिणींनी 'We are Getting Drunk' अशा संदेशाचे टी-शर्ट घातले आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सईने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र तो व्यक्ती कोण आहे, हे सांगितले नव्हते.

यानंतर अचानक सईने साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

सईच्या भावी पतीचे नाव आहे तीर्थदीप रॉय आहे. त्याच्यासोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली.

सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

2015साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.

बिग बॉस मराठीच्या घरात सई व पुष्कर जोग यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.