बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये झळकणार हे कलाकार ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:03 PM2021-07-07T19:03:58+5:302021-07-07T19:42:27+5:30

बिग बॉस मराठी या रियालिटी शोने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. पहिल्या सीझनसोबत दुसरा सीझनही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. बिग बॉस मराठीला मिळालेल्या रसिकांच्या पसंतीमुळेच आता तिस-या सिझनचीही उत्सुकता लागली आहे. या सिझनमध्ये कोणते कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

अभिनेत्री नेहा खान – ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. बिग बॉस ३ मध्ये नेहा स्पर्धक म्हणून एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत.

अभिनेत्री तेजश्री प्रधान- ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेनंतर तेजश्री या शोमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या मालिकेनंतर ती कुठेच झळकली नाही.त्यामुळे या शोमध्ये तिला पाहण्याची रसिकांनाही उत्सुकता आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर – ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे पाठकबाई अर्थात अंजलीच्या भूमिकेमुळे ती आजही ओळखली जाते. अक्षयाची सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री होण्याची शक्यता आहे.

रसिका सुनिल- 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती.

पल्लवी सुभाष - 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' सारख्या हिंदी मालिकांमधून पल्लवी सुभाष हे मराठी नावही घराघरात गाजलंय. पल्लवी सुभाषची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी या शोमध्ये ती झळकू शकते.

केतकी चितळे- मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळ्या गोष्टींवर मत व्यक्त करत वाद ओढावून घेत असते. त्यामुळे केतकी या शोसाठी उत्तम कंटेस्टंट ठरु शकते.

अभिनेता ऋषी सक्सेना – 'काहे दिया परदेस' मालिकेत शिव म्हणून तो लोकप्रिय झाला होता. सध्या तो अभिनेत्री इशा केसकरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतो.

सुयश टिळक- अभिनेता सुयश टिळक या शोमध्ये झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच आयुषी भावेसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे.

अभिनेता चिन्मय उदगीरकर –चिन्मय उदगीरकर सध्या अग्गंबाई सूनबाई मालिकेत झळकत आहे. त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे.

अभिनेता संग्राम समेळ- टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेतून त्याने रसिकांची पसंती मिळवली असली तरी खासगी कारणामुळेही तो चर्चेत होता. त्यामुळे त्याच्याही नावाची जोरदार चर्चा रंगत आहे.