Bigg Boss 16 Photos : वेलकम टू ‘सर्कस’! अलिशान आहे ‘बिग बॉस 16’घर, फोटो पाहून डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 10:10 AM2022-10-01T10:10:36+5:302022-10-01T10:25:22+5:30

Bigg Boss 16 House Photos : होय, बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा संपलीये. आज ‘बिग बॉस 16’चा धमाकेदार प्रीमिअर रंगणार आहे. त्याआधी बिग बॉस प्रेमींसाठी आम्ही बिग बॉसच्या घराचे फोटो घेऊन आलो आहोत...

प्रतीक्षा संपलीये...! होय, बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा संपलीये. आज ‘बिग बॉस 16’चा धमाकेदार प्रीमिअर रंगणार आहे. त्याआधी बिग बॉस प्रेमींसाठी आम्ही बिग बॉसच्या घराचे फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून बिग बॉस प्रेमी खुश्श होतील.

बिग बॉसच्या चाहत्यांना बिग बॉसची प्रतीक्षा असतेच. पण नव्या सीझनमध्ये काय असणार? घर कसं दिसणार? याचीही प्रतीक्षा असते. तर आम्ही बिग बॉस 16 च्या घराचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

बिग बॉसचं घर यंदाही खास पद्धतीने सजवण्यात आलं आहे. थीम आहे सर्कस. होय, सर्कस थीमनुसार संपूर्ण घर सजवण्यात आलं आहे.

बिग बॉसच्या एन्ट्री गेटपासूनच सर्कसची थीम सुरू होते. वेलकम टू सर्कस असं बिग बॉसच्या एन्ट्री गेटवर लिहिलेलं आहे.

यंदाच्या सीझनमध्ये एक नाही तर चार बेडरूम असणार आहेत. याला नावही देण्यात आलं आहे. फायर रूम, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट रूम, क्राईम रूम आणि विंटेज रूम. सगळ्यांची वेगवेगळी थीम आहे.

राऊंड बेड, लक्झरी सुविधा, जकूजी कॅप्टन रूम सगळं कसं अलिशान आहे. या घराचा थाट पाहताना डोळे विस्फाटतील, इतकं सुंदर पद्धतीने घर सजवण्यात आलं आहे.

सर्कस थीमचं सगळ्यांत मोठ्ठ हाईलाईट असेल तो म्हणजे मौत का कुआं. याठिकाणी स्पर्धक टास्क खेळतील.

यावेळी डायनिंग प्रचंड अनोखा आहे. बीबी हाऊसमध्ये यावेळी अनेक नवे एलिमेंट्स सामील करण्यात आले आहेत. 98 कॅमेरे 24 तास स्पर्धकांवर नजर ठेवून असतील.

किचन एरिया सुद्धा बघण्यासारखा आहे. शोचा विनर किचनमध्ये कायम अ‍ॅक्टिव दिसतो. या सीझनमध्येही ते बघायला मिळणार आहे.

घराबाहेर स्वीमिंग पूलही आहे. पूलच्या बाजूने सीटिंग एरिया बनवण्यात आला आहे. राऊंड रेड काऊचला जोडून एक घोड्याचा चमकता स्टॅच्यूही लावण्यात आला आहे. यामुळे पूल एरिया एकदम वेगळा वाटतोय.

लाईटिंग, कलरफुल डेकोरेशन, वाइब्रेंट डिझाईन सर्कस थीमला एकदम परफेक्ट मॅच होत आहेत. घरातील फर्निचरही युनिक आहे. रेड, पिंक, गोल्डन कलर हाइलाईट करण्यात आला आहे.

घराच्या भींती सर्कस थीमनुसार सजवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी फेस मस्कट पाहायला मिळत आहेत. कदाचित त्याचमुळे मेर्कनी कंटेस्टंस्टला मास्क घालून त्यांना लॉन्च करण्याचा प्रयत्न केला होता.

कॅप्टन रूमचा नजारा अनोखा आहे. ही रूम खास पद्धतीने सजवण्यात आली आहे.

सर्कस म्हटल्यानंतर जंगली जनावरंही असणारच. त्यामुळे घरात ठिकठिकाणी अ‍ॅनिमल पोस्टर, वॉलपेपर, स्टॅच्यू लावण्यात आले आहेत.