Bigg Boss 14 : म्हणून त्याने मला घराबाहेर काढले...! सारा गुरपालने सिद्धार्थ शुक्लावर काढली भडास

By रूपाली मुधोळकर | Published: October 14, 2020 02:38 PM2020-10-14T14:38:00+5:302020-10-14T14:47:15+5:30

पंजाबी सिंगर सारा गुरपाल पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस 14’ मधून आऊट झाली.

पहिल्याच आठवड्यात पंजाबी सिंगर सारा गुरपाल ‘बिग बॉस 14’ मधून आऊट झाली. बिग बॉसच्या घरातील सीनिअर्स अर्थात सिद्धार्थ शुक्ला, हिना खान व गौहर खान या तिघांनी मिळून साराला अ‍ॅलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला. साहजिकच घरातून बाहेर पडल्या पडल्या साराने सिद्धार्थ शुक्लावर सर्व भडास काढली.

एका ताज्या मुलाखतीत सारा सिद्धार्थवर बरसली. हिना व गौहरचा मला घराबाहेर काढण्यास विरोध होता. फक्त सिद्धार्थमुळे मी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसमधून बाहेर झाले. त्याने असे का केले? असा सवाल तिने केला.

मला फक्त एका व्यक्तिने नॉमिनेट केले होते. बाकी अनेकांना 3-4 लोकांनी नॉमिनेट केले होते. मी घरातून जावे, अशी कोणाचीही इच्छा नव्हती. पण सिद्धार्थने गौहर व हिनावर आपला निर्णय थोपवून मला घराबाहेर काढले, असे ती म्हणाली.

केवळ एका टास्कसाठी कोणाच्याही मांडीत बसून नाचणे, मला जमले नाही, जमणारही नाही.नॅशनल टीव्हीवर मी हे करू शकत नाही. सिद्धार्थ म्हणतो की, पर्सनॅलिटी टास्क चांगला केला नाही. टास्क तर चांगलाच केला होता. फक्त त्याच्या मांडीत बसून नाचले नाही आणि म्हणून त्याने मला थेट घरातून बाद केले, असेही सारा म्हणाली.

निशांत मल्कानी, राहुल वैद्य व जान कुमार सानू यांच्यापेक्षा माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता. मी नाही तर यांच्यापैकी कोणी एक घरातून बाहेर जायला हवे होते. पण सिद्धार्थच्या पक्षपाती निर्णयामुळे मी बाहेर पडले, असेही सारा म्हणाली.

सिद्धार्थ केवळ निक्कीची बाजू घेतो. तिने कितीही चुका केल्या तरी तो माफ करतो. तो बायस्ड आहे, असा ठपका तिने ठेवला.

साराला घराबाहेर काढण्याचा सीनिअर्सचा निर्णय बिग बॉसच्या फॅन्सलाही पटलेला नाही. अनेक फॅन्सनी यावरून सीनिअर्सवर टीका केली होती.

सारा ही एक पंजाबी मॉडेल, सिंगर व अभिनेत्री आहे. ती एक डान्सरही आहे.

2012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. 2017 मध्ये डेंजर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.

Read in English