पतीपासून लांब राहते राखी सावंत, म्हणून पडलीय एकटी, राहुल महाजनने सांगितल्या तिच्या विषयी धक्कादायक गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 02:28 PM2020-12-30T14:28:03+5:302020-12-30T14:37:20+5:30

'बिग बॉस 14' प्रत्येक भागांप्रमाणे यंदाचा सिझनही रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहे. वाद विवाद रोमान्स सगळे काही यंदाच्याही भागात बघायला मिळत आहे. हा शो अधिक रंजक करण्यासाठी राखी सावंतलाही स्पर्धक म्हणून सहभागी करण्यात आले आहे.

राखी सावंतने पहिल्याच दिवसापासून सर्वांचे मनोरंजन केले आहे. भांडण, भावनात्मक नाटक कितीही असो, प्रत्येक वेळी राखी गंमतीदार गोष्टी करत सा-यांचे मनोरंजन करत आहे.

रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी राखी कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीय. ना-ना त-हा करत ती सतत लक्ष वेधून घेते.

घरात राहुल महाजन जो स्वतःला राखीचा चांगला मित्र असल्याचे सांगतो. तोच राहुल महाजन वेळ पडल्यावर राखील सपोर्टही करत नाही.

राहुल महाजनने राखीचे अनेक किस्से सांगितले, 'राखी इतकी स्ट्रॉंग बनली आहे याला कारण म्हणजे तिच्या आयुष्यात ती खूपच एकटी पडली आहे.

गेली दोन वर्षे तिच्या पतीलाही भेटलेली नाही. राहुलने सांगितले की यापूर्वी कधीही तिला इतके एकटे पडल्याचे पाहिले नव्हते.

लग्नानंतर ती पतीबरोबर हनीमूनला जावू शकली नाही आणि दोन वर्षांपासून भेटली नाहीय. ती खूप मानसिकरित्या खचली गेली आहे.

खीची अशी इच्छा आहे की तिच्याबरोबर असलेली प्रत्येकजण तिच्याकडे परत यावी. कोणीही तिच्यापासून लांब जावू नये.

आज राखी खूप यशस्वी अभिनेत्री आहे. करोडो रुपयांची तिच्याकडे संपत्ती आहे, पण राखीकडे तिच्यावर प्रेम करणारी माणसं नाहीत.

राहुलने राखी विषयीच्या सगळ्या गोष्टी घरात सांगत तिच्यावर चर्चा करताना दिसला.

राखीच्या येण्याने यंदाचा सिझन तुफान हिट ठरत आहे.