राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, तिचा पती आधीच आहे विवाहीत, पहिल्या लग्नापासून आहेत मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 11:28 AM2021-02-03T11:28:42+5:302021-02-03T11:34:57+5:30

'बिग बॉस १४' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत आपल्या अंदाजाने रसिकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. इतर स्पर्धकांपेक्षा राखी सावंत सगळ्यात जास्त एंटरटेनिंग आहे. त्यामुळे राखीच्या लोकप्रियतेचा या शोलाही चांगलाच फायदा होत आहे.

ड्रामेबाज राखी सावंत रसिकांचे मनोरंजन कसे होईल यासाठी एकही कसर बाकी ठेवत नाही.

शोमध्ये एंट्री करताच ती विवाहीत असल्याचे सांगत तिची प्रेमकहानी सांगत लक्ष वेधून घेत असते.

राखी सावंतने ज्याच्याशी लग्नगाठ बांधली तो दुस-याच दिवशी तिला सोडून निघून गेला अशी कहानी ती सगळ्यांना सांगत असते.

नुकत्याच झालेल्या भागात राखीने पुन्हा एकदा तिच्या लग्नाविषयी बोलताना दिसली.

राखीचा पती रितेशचे राखीसह दुसरे लग्न आहे.रितेशचे आधी लग्न झाले होते ही गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवल्याचे ती सांगते.

राखीला रितेशने धोका दिला आहे. लग्नानंतर रितेशने त्याच्या पहिल्या लग्नाविषयी तिला सांगितले.

तिच्या अधु-या प्रेमाची कहानी सांगताच राखी ढसाढसा रडू लागते.

राहुल वैद्यजवळ ती रडताना सांगते की, रितेशला पहिल्या लग्नापासून मुलं आहेत. मला तर मुलं पण नाही किती दुःख सहन करु.

मलाही माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे.

माझीही मुलं व्हावीत असे मलाही वाटते त्यासाठी अंडाशयाचेही जतन तिने करुन ठेवल्याचे सांगते.