Bigg Boss 14 दगा बाज रे, अभिनवने दिला राखीला दगा, अर्शीला दिली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:03 PM2021-01-16T12:03:59+5:302021-01-16T12:08:00+5:30

राखी सावंत आता अभिनव शुक्लावर लट्टु झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनव शुल्कासह जास्त वेळ घालवताना दिसली.

तिला वाटतंय सारी दुनिया तिची दिवानी.आयटम गर्ल राखी सावंतच्या प्रत्येक अदावर सारे लट्टू. ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही....

आता हेच पहा. कधी पाहिलंय का राखीला तुम्ही या अंदाजात. नेहमीच आपल्या बोल्ड अवतारात सा-यांना क्लीन बोल्ड करणारी राखी पक्की भारतीय नारी बनलीय.

बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखीने घरात एंट्री करताच ती विवाहीत असल्याचे नौटंकी केली. लग्नानंतर पती रितेश तिला भेटलाच नाही असे सांगत तिने सिम्पथी मिळवायला सुरुवात केली.

राखीची नौटंकी इथेच थांबली नाही, रूबीना दिलैक आणि अभिनव ही जोडी रसिकांंची आवडती जोडी आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही तुफान आवडते.

राखीही आता अभिनव शुक्लावर लट्टु झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनव शुल्कासह जास्त वेळ घालवताना दिसली.

मात्र अभिनवला राखीची साथ नकोशी झाल्यामुळेच त्याने तिचा पिच्छा सोडवण्यासाठी एक शक्कलच लढवली.

बिग बॉसद्वारे देण्यात आलेल्या टास्कमध्ये अर्शी आणि राखी यांना जास्त वोट हवे होते. ज्या सदस्याला जास्त वोट मिळतील तो कॅप्टन ठरणार होता.

राखीला वाटले की, घरातील तिच्याशी चांगले वागणारे स्पर्धक तिला वोट देतील यांत अभिनव हा राखीलाच वोड देईल अशी तिला खात्री होती.

मात्र असे झाले नाही. अभिनवने राखील नापसंती देत अर्शीला वोट दिला आणि तिथेच राखीला पुन्हा एकदा प्रेमात धोका मिळाल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे राखीची घरातील अवस्था पाहून दगा बाज रे, याच ओळी राखी अभिनवसाठी तंतोतं लागू ठरतात.